भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेंचें जें सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी

parenchen jen sukh pashyanti bhogi | tochi rajayogi mukutamani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परेंचें जें सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी ॥१॥ सिद्धाची ही खुन साधक सुख जाण । सदगुरुसी शरण रिघोनिया ॥२॥ वैखरीं व्यापारी मध्यमेच्या घरीं । ओंकाराच्या शिरी वृत्ति ठेवी ॥३॥ आदिनाथ ठेवणें सिद्ध परंपरा । जनार्दनीं वेव्हारा एकनाथीं ॥४॥