भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटीं

parehuni parata vaikhariye kanada | viththal ughada bhitatatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटीं ॥१॥ शिणली दरुशनें भागली पुराणें । शास्त्राचियें अनुमानें न ये दृष्टी ॥२॥ नेति नेति शब्दे श्रुती अनुवादती । ते हे विठ्ठलामुर्ति विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं चहू वाचां वेगळा । तेणें मज चाळा लावियेला ॥४॥