भजनी मालिका
← भजनांकडे परत

परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा

parapashyanti madhyama vegala | vaikhariye nirala shiv jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥ आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहूं वांचा शिव जाणा ॥२॥ एका जनार्दनीं जीवांचें जीवन । सर्वां घटीं पूर्ण शिव जाणा ॥३॥