भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें

papapunya donhin samanachi ganthi | nam japa hotin shriramanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्रीरामाचें ॥२॥ भोग रोग नासे कल्पना दूर देशे । श्रीराम मुखी वसे प्राणीयांसी ॥३॥ एका जनार्दनीं नामींच विश्वास । ठेवितां निश्चयास दोष भंगे ॥४॥