भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं

papachi mi rashi | sevachor payampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥ जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥ तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥