भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज

panduranga kanhin aikavi mat | na karaven mukta atan maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥ जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥ वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥ करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥ तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंकिले पांडुरंगा ॥४॥