भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां

panduranga aisa sanduni vevhara | anikanchi kara as vanyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥ बहुतां दिधला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥ तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥