भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणें कांहीं

panditanchya vachana dyaven anumodan | pari hot nohe jan tenen kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणें कांहीं ॥१॥ शास्त्रीयाचे वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें कांहीं ॥२॥ वेदांताच्या वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥३॥ पुराणिकांचे वचनीं द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥४॥ संताच्या वचना द्यावें अनुमोदन । एका जनार्दनीं तेणें हित होय ॥५॥