भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला

pandit tochi ek bhala | nitya bhaje jo viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥ अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥ तुका म्हणे तोचि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥