भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म

pandit shastri hoti nich yati | tyanche aikatati niti te dharma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचें सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥ एका जनार्दनीं आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥