भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख

pandit mhanatan thor sukh | pari to pahatan avagha murkha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥ काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥ हा तेथींचा अनुभव । तुका देखे जीवीं शिव ॥३॥