भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ

pandharis duhkh na mile okhada | premasukh sada sarvakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदिमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥