भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे

pandhariche varakari | te adhikari mokshache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि ॥२॥ तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥