भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी

pandhari pandhari | mhanatan papachi bohori

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥