भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय

pandhara bhagale solansi na kale | satara vedavale na kale may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥ एकुणवीस भले विसांतें पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥ एकवीस वेगळे विसीं मुराले । तयांचे तयां न कळे गे माय ॥३॥ तेवीस चोवीस वर्तें जगाकारीं । एका जनार्दनीं पंचविसावा हृदयीं गे माय ॥४॥