भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय

panchavisava shriviththalu | chauvisanvegala tayacha khelu ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥ तो पुंडलीका कारणें येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥ जनीं जनार्दन करावय उद्धरण । एका जनार्दनी समचरण साजिरें गे माय ॥३॥