भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं

panchabhuten navhatin jain | tain vruksha dekhila bhai | adhobhagin shenda mul pahin | vari vendhali tisi pay nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥ सांगें तूं आमुचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं नको पुढें ॥धृ०॥ नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंचभूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥ तयावरी एक सर्पीण । तिनें खादलें त्रिभुवन । शरण एका जनार्दन । हें योगियांचें लक्षण रे ॥३॥