भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें

panchabhutanchiye sampadalon sandin | ghatalonse bandin ahankaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥१॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां ही ॥ध्रु.॥ कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥ कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरीली ॥३॥ किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥ तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥