भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंच वर्षीय बाळ खेळे नाना खेळ । मेळवोनि मेळ सवंगडियांचा

panch varshiy bal khele nana khel | melavoni mel savangadiyancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंच वर्षीय बाळ खेळे नाना खेळ । मेळवोनि मेळ सवंगडियांचा ॥१॥ सवंगड्यांत खेळे विटीदांडु चेंडू । नामाचा छंद मुखी सदा ॥२॥ खेळतां खेळतां राजावाड्या आला । न कळे तयाला राजा कवण ॥३॥ एका जनार्दनीं पाहूनियां बाळ । मोहें त्या तात्काळ उचलिलें ॥४॥