भजनी मालिका
← भजनांकडे परत

पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें

pakshi jala svayen jen vayu lekarun | tyachya kriya parun kelya ramen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें ॥१॥ शबरीची फळे उच्छिष्ट तीं खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥ एका जनार्दनीं श्रीराम सखा । भक्त अभक्तं निका सोडवण ॥३॥