भजनी मालिका
← भजनांकडे परत

पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती

pakshi anganin utarati | ten kan puroniya rahati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती ॥१॥ तैसें असावें संसारीं । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥ वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥३॥ शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥४॥