भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब

pail gharin jali chori | deha karin bomb

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥ हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटयां वाय ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥ तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥