भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति

pail ala ram ravanasi sangati | kay nidasura nijalasi bhupati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥ अवघें लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेई आतां संबंधेसी तुटी ॥३॥