भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी

paikichen sukh paikasi thaven | mhanoniyan jiven keli sati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥१॥ येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टि वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥ पाईकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥ तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥