भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें

paikapanen khara mushara | paik to khara paikinen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥ पाईक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥२॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांव खरेपण ॥३॥ तुका म्हणे ठाव पाईकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥