भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं

paikapanen jotila siddhant | sur dhari mat vachan chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥ पाइकीवांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥ तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥४॥