भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुनियां मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा

pahuniyan manogat | purava het tumhi majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहुनियां मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा ॥१॥ मग मी न सोडी चरणां । संत सुजाणा तुमचीया ॥२॥ दंडवत घालीन पायां । करा छाया कृपेची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । मुगुटमणीं तुम्हीं संत ॥४॥