भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां

pahuniyan gora dandavat ghali | mhane kon sthalin vasti tumhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥ पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥ सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥ ऐकोनियां मात गोरा संतोषला । रहावें कामाला माझे घरीं ॥४॥ विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलों । एका जनार्दनीं जाहलों निर्भय आतां ॥५॥