भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें

pahuni krushnasi anand manasi premabharit aharnishin krushnanamen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥ आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥ भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥ एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥