भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी

pahune gharasi | aji ale hrushikeshi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ध्रु.॥ दरदरीट पाण्या। माजी रांधयेल्या कण्या ॥२॥ घरीं मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा ॥३॥ मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥४॥