भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुं जातां नारायणा । पाहतां मुकिजे आपणा

pahun jatan narayana | pahatan mukije apana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहुं जातां नारायणा । पाहतां मुकिजे आपणा ॥१॥ ऐसा भेटीचा नवलाव । पाहतां नुरे भक्तदेव ॥२॥ पाहतां नाठवेचि दुजें । तेंचि होइजे सहजें ॥३॥ एका जनार्दनीं भेटी । जन्ममरण होय तुटी ॥४॥