भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहूं गेलों तुळशी बन । वृंदावनीं जनार्दन

pahun gelon tulashi ban | vrundavanin janardan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहूं गेलों तुळशी बन । वृंदावनीं जनार्दन ॥१॥ मूळ डाळ पाहतां पान । तुळशी वास जनार्दन ॥२॥ तुळशीविण कोष्ठें जावो । तुळशीमाजीं दिसे देवो ॥३॥ एका जनार्दनीं भावो । तुळशी जाला कृष्ण रावो ॥४॥