भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईंन पवित्र पांडुरंग

pahili majhi ovi ovin jaganna | gainn pavitra pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥ दुसरी माझी ओवी दुजें नाही कोठें । जनी वनी भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥ तिसरी माझी ओवी तिला नाहीं ठाव । अवघाची देव जनीं वनीं ॥२॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥ पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंग ॥४॥ साहावी माझी ओवीं साहाही आटली । गरुमूर्ती भेटली पांडुरंग ॥५॥ सातवी माझी ओवी आठवी वेळोवेळां । बैसलो डोळां पांडुरंग ॥६॥ आठवी माझी ओवी आठ्ठावीस युगें। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥ नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥८॥ दाहावी माझी ओवी दाहा अवतार । न यावें संसारा तुका म्हणे ॥९॥