भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय

pahatosi kay | atan pudhen karin pay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥ तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥