भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी

pahati gaulani | tanv palathi dudhani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥ त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥ सवें तुक्या मेला । त्याणें अगुणा आणिला ॥३॥