भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख

pahatan shrimukh sukhavalen sukh

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥ जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥ श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥ महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥