भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी

pahatan govali | khay tyanchi ushtavali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥ आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥ एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥