भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग

paha paha usan baisalase kal | bharali te vel na chuke mag

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥ सर्वही संबंधीं असतां जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥ पाहे पां तो बोका बैसतो टपूनी । जातो उचलोनी घेउनी अंश ॥३॥ एका जनार्दनीं किती भाकूं कींव । नायकती जीव गुंतले ते ॥४॥