भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें

paha ho deva kaise jan | bhinna bhinna sanchiten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥ पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥ तुका म्हणे जे जे जाती । त्याची स्थिति तैशी ते ॥३॥