भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं

padoniyan rahin | uga cha santanchiye payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥ न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥ सहज ते स्थिति । उपदेश परयुक्ती ॥२॥ तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥