भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी

padilon bhovanin | hoton bahu chintavani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥ होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥