भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण

padili he rudhi jaga parichar | chalaviti vevhar satya hmun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥ध्रु.॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥ तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥