भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले

padila prasang kan mi aisa nenen | sankalpa te manen jiravale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥ध्रु.॥ लावूनियां दृष्टि घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥ तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥