भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी

padavi te bari | ganthi dhuresaven khari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥ नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥ लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥ तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥