भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी

padatan jad bhari | dasin athavava hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥ तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥