भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें

nivruttinath tin aksharen | sada jap kari nirdharen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥ पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥ पुनरपि जन्माची । वार्ता नाहीं नाहीं साची ॥३॥ अनुभव धरावे वेगीं चित्तीं । एका जनार्दनीं करी विनंती ॥४॥