भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं

nivant shrimukh pahaven dolebhari | tenen nure antarin ichchha kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥ चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥ ध्यान ते दृष्टी भरूनि पहावें । आलिंगन द्यावें वेळोवेळां ॥३॥ हृदयकमळीं पहावा तैसा ध्यावा । एका जनार्दनीं विसावा सहजची ॥४॥