भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा

nivant baisen tun achal | man karuni nishchal | nako kanhin talamal | nam gay sarvada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥ सोडीं मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं ॥२॥ नको समाधी उन्मनी । धांवूं नको सैरा रानीं । एका जनार्दनाचे चरणीं । दृढभावें विनटे ॥३॥