भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग

nitya nava kirtanin kaisa vodhavala rang | shrota ani vakta svayen jala shrirang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥ आल्हादें वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥ पदोपदीं कीर्तनीं निवताहे जन मन । आवडी भुकेली तिनें गिळिलें गगन ॥३॥ एका जनार्दनीं गातां हरीचें नाम । निमाली इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥