भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें

nitya kal vache jaya nam chhand | tayasi govind mage pudhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें ॥१॥ घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥ ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥ एका जनार्दनीं वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥